सभेला पोलीसांच्या परवानगीची गरज नाही
औरंगाबाद /प्रतिनिधी- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला पाच दिवस शिल्लक राहिले असून देखील अजून पोलिसांनी सभेला परवानगी दिली नाही त्यामुळे पोलिस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारीला लागा अhसे आदेश राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे.
दिनांक 1 मे रोजी औरंगाबाद सभा घेण्याचे राज ठाकरे यांनी जाहीर करताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. लहान-मोठ्या पक्ष संघटनांनी सभेबाबत विरोध दर्शवला आहे. भाजपकडून सभेबाबत अद्याप काही प्रतिक्रिया नाही. तर शिवसेनेने सभेमुळे शहराच्या शांततेला बाधा पोहोचेल अशी भीती व्यक्त केली आहे. मनसेने शहरात वॉर्डनिहाय निमंत्रण पत्रिका वाटप करण्यास सुरुवात केली आहे. काही संघटनांनी सभेला पाठिंबा दिला आहे.
मनसेची भूमिका ठाम
सभेला परवानगी मिळो अथवा न मिळो सभा होणारच अशी भूमिका मनसेने घेतली आहे. दरम्यान पोलिसांनी गरवारे स्टेडियमवर सहभाग घेण्याची सूचना केली परंतु मनसेने सांस्कृतिक मंडळावर सभेसाठी हट्ट धरला आहे.
मनसेच्या सभेला परवानगी देण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने अद्याप घेतलेला नाही. सभेला परवानगी न मिळाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा इशारा मनसेने दिला आहे.