कर वसुलीच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही- प्रशासक
औरंगाबाद /प्रतिनिधी - करवसुली च्या कामात हलगर्जीपणा कर्मचाऱ्यांना निलंबित किंवा बडतर्फ करण्याचे आदेश महानगर पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी आज दिले.
आज दि 22 सप्टेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे प्रभाग क्रमांक 1,2 आणि 3 या प्रभागची वसुली आढावा बैठक प्रशासक यांनी घेतली.
या बैठकीत संबंधित विभाग प्रमुख ,पालक अधिकारी,वार्ड अधिकारी तसेच सर्व वसुली कर्मचारी यांच्या कडून पांडेय यांनी आढावा घेतला. याबाबत आढावा घेत असताना वसुली संदर्भात कुठलेही प्रगती दिसून न आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.आणि यापुढे वसुली च्या कामात बेजबाबदारपणा आणि दिरंगाई दिसून आल्यास संबंधित कर्मचाऱ्यास निलंबित किंवा बडतर्फ करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
करवसुली चे काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली किंवा त्यास अतिरिक्त कार्यभार देऊ नये असे आदेश त्यांनी दिले.
यावेळी प्रशासकांनी प्रत्येक वसुली लिपिक आणि कर्मचारी यांची विचारपूस केली असता डिमांड बिल वाटप चे काम अजूनही अपूर्ण आहे असे त्यांचे निदर्शनास आले.यावर तीव्र नाराजी व्यक्त करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले अधिकारांचा वापर प्रभावीपणे करून दोषी कर्मचारी विरुद्ध कारवाई करण्याची सक्त ताकीद दिली.वसुलीच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही तसेच मागील काळात कर वसुली प्रणालीत ज्या त्रुटी आणि चूका झाल्या असतील त्या पुन्हा पुन्हा होणार नाही याची दक्षता घ्यावी असे ते म्हणाले.सदरील बैठकीत अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने,मुख्यलेखाधिकारी संजय पवार,उप आयुक्त अपर्णा थेटे व इतरांची उपस्थिती होती.