चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू
श्रीनगर / प्रतिनिधी - वैष्णोदेवी मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या 12 भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला असून 20 भाविक जखमी झाले आहेत अशी माहिती नुकतीच समोर आली आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. जखमी भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मदत व बचाव कार्य सुरू आहे.
अधिक माहिती अशी आहे की, आज सकाळी शहरात चेंगराचेंगरी होऊन 20 जण जखमी झाले परंतु बचाव कार्य करत असताना बारा भाविकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव कार्य सुरू केल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले.
रियासी येथील नियंत्रण कक्षाने सांगितले की कटरा येथील माता वैष्णोदेवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत फक्त जखमी झाले असून सध्या बचावकार्य सुरू आहे. या घटनेनंतर प्रशासन आणि व्यवस्थापनाने पुढील आदेशापर्यंत यात्रा स्थगित केली आहे.