चायनीज नायलॉन मांजा विक्री करणा-या महिलेस अटक

चायनीज नायलॉन मांजा विक्री करणा-या महिलेस अटक

औरंगाबाद /  प्रतिनिधी - मानव पशु पक्षांच्या जिवीतास अपाय कारक असलेला नायलॉन/ प्लॉस्टीक, सिथेटीक धाग्या पासून बनविलेला मांजा खरेदी विक्री करणारे, साठा करणारे दुकानदार यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारचा प्रतिबंधित मांजा आपल्या परिसरात कोणीही विकत असेल तर त्याची माहिती द्यावी.

पोलीस निरिक्षक प्रशांत वी पोतदार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, हमीदीया गार्डन बीड बायपास औरंगाबाद येथे एक महिला तिच्या राहत्या घरात शासनाने बंदी घातलेला चायनीज नायलॉन
मांजाची अवैध रित्या विक्री करत आहे . माहिती माहिती मिळताच त्यांनी पथक प्रमुख पोउपनि देवीदास शेवाळे यांना कळवीले व कार्यवाही करण्याचे आदेश दिले. पोउपनि देवीदास शेवाळे यांनी पथकासह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा मारला असता सुरवा बेगम जफर खान (वय 56 वर्ष )व्यवसाय पंतग विक्री रा. हमीदीया गार्डन बीड बायपास औरंगाबाद हिच्या राहत्या घरी शासनाने प्रतिबंधीत केलेला 35,500/-रु किंमतीचा चायनीज नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना आढळल्याने मांजा जप्त करुन या महिले विरुध्द पोलीस ठाणे सातारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई  पोलीस आयुक्त निखील गुप्ता पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 चे शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभागाचे  विशाल दुमे, सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  प्रशांत वी. पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि देविदास शेवाळे, सफो/नंदकुमार भंडारे, सुनिल धुळे, मनोज अकोले,सुनिल पवार, दीपक शिंदे, खिल्लारे, बाडीलाल जाधव चालक पोशि गंगाधर धनवटे यांनी केली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा