शेतकरी आणि बहुजनांच्या हक्कासाठी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीत सामील व्हा -अर्जुन राव गालफाडे
औरंगाबाद /प्रतिनिधी - दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर घाणेगाव तालुका गंगापूर येथे राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या शाखा क्रमांक 26 चे उद्घाटन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय अर्जुनराव गालफाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सैनिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय कॅ. अरविंद गायकवाड ,प्रदेश महासचिव ह. भ .प. रमेश खोसे ,औरंगाबाद जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष विलास सौदागर, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ गालफाडे ,गंगापूर तालुका अध्यक्ष कर्तारसिंग राठोड, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटोळे,जिल्हा सरचिटणीस मोठे अण्णा आदींची उपस्थिती होती .
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष माननीय अर्जुनराव गालफाडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी हा या देशाचा अन्नदाता शेतकरी, कष्टकरी समाज,कामगार वर्ग व सर्व बहुजन वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष आहे.या पक्षामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना समानतेची संधी दिली जात आहे.आज देशामध्ये शेतकऱ्यांचे हाल चालू आहेत. अस्मानी संकटा बरोबर सुलतानी संकटही शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. केंद्र शासन देशाची संपत्ती विकून विकास साधण्याचा आव आणत आहे .राज्य शासनानेही सध्या जाहीर केलेली हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारी ठरली आहे. कामगारांच्या विरोधात सरकारने काळे कायदे करून कामगार वर्गाला देशोधडीला लावण्याचे काम सुरू केले आहे. मुठभर उद्योगपतींना लाखो करोडो रुपयाची खिरापत वाटली जात आहे ,परंतु या देशाचा अन्नदाता याची मात्र क्रूर चेष्टा करण्यात येत आहे हे सर्व बदलायचे असेल तर राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या झेंड्याखाली शेतकरी आणि कामगार वर्ग व बहुजनांनी येणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून येणाऱ्या काळात गाव तिथे शाखा वार्ड तिथे शाखा काढून शेतकरी आणि कष्टकरी यांचे राज्य या देशात स्थापन करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागले पाहिजे असे यावेळी अर्जुन राव गालफाडे यांनी आवाहन केले.
याप्रसंगी युवा जिल्हा उपाध्यक्ष गोरख गायकवाड, युवा तालुका अध्यक्ष औरंगाबाद पश्चिम दादासाहेब काळे पाटील ,तिसगाव शाखेचे अध्यक्ष किरण लोखंडे आधी हजर होते .या कार्यक्रमासाठी घाणेगाव शाखेचे अध्यक्ष कैलास शिंदे ,सचिव कृष्णा दनके उपाध्यक्ष कपिल गापणे, सचिन गवारे, सुनील गवारे ,सल्लागार दीपक काळे, गजानन गोपने, शुभम गायके, राजू बनसोडे ,राजू रोडगे ,विजय हराळे, बबन गायके, किरण पठारे, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेे.