लसीचे खोटे प्रमाणपत्र बाळगणार् यांनो सावधान दंडात्मक कारवाई होणार
औरंगाबाद /प्रतिनिधी - कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ मंडलेचा व उपायुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद महानगर पालिकेच्या नागरिक मित्र पथकाचे कर्मचारी मार्फत शहरातील विविध भागात नागरिकांचे कोविड लसीकरण प्रमाणपत्र तपासण्याची मोहीम काल पासून सुरू करण्यात आली आहे.
आज 15 पथकामार्फ़त अंदाजे 5950 नागरिकांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासण्यात आले.यात 34 नागरिकांनी अद्याप लस न घेतल्याचे आढळून आले .या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून प्रती व्यक्ती 500 रु प्रमाणे 17000 रु दंड वसूल करण्यात आला व लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच आज विविध ठिकाणी जास्त कचरा आढळून आल्या बाबत 4 जणांकडून 600 रु ,प्रतिबंधित प्लस्टिक आढळून आल्याबाबत 4000 रु ,असे एकूण 21600 रु दंड वसूल करण्यात आल्याची माहिती नागरिक मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांनी दिली आहे.