पुण्यात दोन भीषण अपघात

पुण्यात दोन भीषण अपघात

पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ आणि आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर जेजुरीजवळ दोन भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
 पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ आयशर टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला. 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर जेजुरीजवळ बेलसर फाटा येथे एसटी बस आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी मक्झिमो गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला. आयशर टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नात असताना त्याची धडक मॅक्झिमो गाडीला लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात 9 जण ठार असून काहीजण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. 
आयशरने एका मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला धडक दिल्यामुळे मॅक्झिमो गाडी समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर डेपोच्या एसटी बसला जाऊन धडकली. आयशर आणि बसमध्ये मॅक्झिमा गाडीचा चक्काचूर झाला आणि त्यामधील 11 प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यातील 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  

जेजुरीजवळ अपघातात 3 जणांचा मृत्यू
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर जेजुरीजवळ बेलसर फाटा येथे एसटी बस आणि दुचाकीची धडक होऊन भीषण झाला. यात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत एकाच वस्तीतील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे पारगाव मेमाणे परिसरावर शोककळा पसरली आहे. रमेश किसन मेमाणे (वय 60), संतोष दत्तात्रय मेमाणे (वय 40) आणि पांडुरंग दामोदर मेमाणे (वय 65) अशी या तिघांची नावे आहेत. 
तिघेही पुरंदर तालुक्यातील बोरमाळ वस्ती, पारगाव मेमाणे येथील रहिवाशी आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार, सासवड-जेजुरी रस्त्यावर बेलसर फाट्यादरम्यान सध्या उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. काल गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे तिघेही दुचाकीवरून रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. एसटी चालकाने वेग कमी करून बस रस्त्याखाली नेण्याचा प्रयत्न केला. मात्र बसखाली अडकल्यामुळे दुचाकी काही अंतर फरफटत गेली. यात तिघांचाही मृत्यू झाला. 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा