अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - राज्यमंत्री अब्दुल सत्तार

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - राज्यमंत्री अब्दुल सत्तार

सिल्लोड / प्रतिनिधी :  तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करा असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तहसीलदार विक्रम राजपूत यांना दिले. 

      गेल्या दोन - तीन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असून घरांची पडझड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवार ( दि.6 ) रोजी तातडीने तालुक्याचा दौरा करून नुकसान झालेल्या भागाची पाहणी करीत शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केले. तसेच हवामान खात्याने पुढील पाच दिवसांत दिलेल्या अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता तालुका आपत्ती व्यवस्थापनाने सतर्क रहावे असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रशासनास दिले आहेत.

  नदीकाठच्या लोकांनी खबरदारी घ्यावी
       दरम्यान राज्यात सर्वत्र येत्या पाच दिवसांत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या अनुषंगाने नदीकाठच्या लोकांनी खबरदारी घ्यावी तसेच आपले पशु धन सुरक्षित स्थळी ठेवावे असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा