मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी अभाविप ने केले हुतात्म्यांना अभिवादन

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी अभाविप ने केले हुतात्म्यांना अभिवादन

औरंगाबाद /प्रतिनिधी -  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त अभाविप संभाजीनगर शाखेच्या वतीने  हुतात्मा स्मारक क्रांती चौक या ठिकाणी अभिवादन करण्यात आले प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यावेळी उपस्थित होते त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाची पार्श्वभूमी, चळवळ भूमिका, व हुतात्म्यांचे योगदान याविषयी माहिती देऊन भविष्यात मराठवाड्याच्या प्रगती व विकासासाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात सकारात्मक विचार करून तसे कार्य करावे असे सांगितले.
तद्नंतर पैठण गेट, पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुण अभिवादन करण्यात आले. महानगर मंत्री निकेतन कोठारी यांनी गोविंद भाई श्रॉफ यांची मराठवाडा मुक्तिसंग्रामात असलेली भूमिका या वेळी विषद केली.औरंगपुरा येथील
महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्या  पुतळ्याला पुष्पार्पण केले.बजाज नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करुण वृक्षारोपण व शिववंदना घेण्यात आली. विद्यापीठातील वाय कॉर्नर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले व  मराठवाडा मुक्तिसंग्राम या विषयावर अध्ययन मंडळ आयोजित करून चर्चा-सत्र घेतले यावेळी शामसुंदर सोडगिर,रणजीत खटके,नागेश गलांडे, ऋषिकेश केकान यांनी विषय मांडणी केलीी.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा