आधी केली तिची हत्या नंतर आत्महत्या....
औरंगाबाद/ प्रतिनिधी - ब्रिजवाडी येथील रेणुका ढेपे या १९ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करून पसार झालेल्या शंकर विष्णू हागावणे याने देखील पिसादेवी जवळील गोपाळपुरीतिल एका शेतात शुक्रवारी (दि.२०) रोजी सकाळी गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
रेणुका आणि शंकर दोघांचेही मैत्रीचे संबंध असल्याने शंकरच्या घरी जाणे येणे होते. बुधवारी दुपारी घरातील इतर मित्रा बाहेर गेल्यावर रेणुकाला घरी बोलावून डोके ठेचून व गळफास देत हत्या केली होती.तेंव्हा पासून तो पसार होता.शुक्रवारी सकाळी पिसादेवी जवळील गोपाळपुरी भागातील शेतात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केलेल्या अवस्थेत शंकरचा मृतदेह आढळून आलं. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे