स्मार्ट सिटीमध्ये भिकारी व तृतीय पंथीयांमुळे नागरिक त्रस्त कोरोनाच्या नियमांची पायमल्ली

स्मार्ट सिटीमध्ये भिकारी व  तृतीय पंथीयांमुळे नागरिक त्रस्त  कोरोनाच्या नियमांची पायमल्ली

औरंगाबाद/प्रतिनिधी - आशिया खंडात सर्वात वेगाने वाढणारे शहर म्हणून ख्याती मिरवणाऱ्या  औरंगाबाद शहरात विकासाची नवनवी कामे सुरू आहेत.  पर्यटनासाठी, स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामे सुरू आहेत. परंतु शहरातील अनेक सिग्नलवर तृतीयपंथी व भिकारी लोकांना पैसे मागतांना आढळून येतात़ त्यामुळे खरच शहराची प्रगती होत आहे की, अधोगती असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 
 शहरात वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे.  सिग्नलवर एकाच वेळेस शेकडो गाड्या उभ्या राहतात.  प्रत्येकजण आपल्या महत्त्वाच्या कामासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करत  ठराविक ठिकाणी जात असतो़. अशा परिस्थितीत आंघोळ न केलेले,अतिशय गलिच्छ कपडे घातलेले भिकारी सिग्नलवरील लोकांच्या अंगाला हात लावून भिक मागतात.  पैसे दिले नाहितर त्यांची  प्रतिक्रीया अतिशय वाईट असते.  विशेष म्हणजे भिक मागण्यासाठी लहान बालकांचा वापर केला जातो.  त्यात एखाद्या गाडिचा धक्का जर त्या बालकाला लागला तर वाहनधारकास जबाबदार धरून त्याला कायद्याची भीती दाखवत पैसे उकळले जातात.  तृतीयपंथी देखील अचानक गाडी समोर येउन गाडी अडवत असल्यामुळे अनेकदा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.  
      या सर्व बाबींवर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये एक झापू पथक असते पण ते फक्त नावालाच आहे.  बाल कल्याण समिती ही वर्षातून एखाद्या वेळेस दिखाव्यासाठी कारवाई करते.  पोलिसांसमोर सगळ्या गोष्टी घडत असतांना देखिल पोलिस सरळ कानाडोळा करतात.  मग याला जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. 
  कोविडच्या नियमांचे काटेकोर  पालन करा अन्यथा दंड आकारणारी महापालिका, पोलिस यंत्रणा आणि पोलिस व बाल कल्याण समिती याबाबतीत काय ठोस पाउल उचलते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल. 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा