केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांची राज्यमंत्री सत्तार घेणार भेट

केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांची राज्यमंत्री सत्तार घेणार भेट

सिल्लोड /प्रतिनिधी-  औरंगाबाद ते जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र हे काम धीम्या गतीने सुरू असून ते जलद गतीने करा. अशा सूचना महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आज  मंत्रालयातील त्यांच्या दालनात घेतलेल्या बैठकीदरम्यान ते बोलत होते. बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता बी. एम. थोरात, कार्यकारी अभियंता पल्लवी सोनवणे, कनिष्ठ अभियंता सागर कळम उपस्थित होते.

अनेकांना गमवावे लागले प्राण

औरंगाबाद - जळगाव महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. रस्त्याचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने या ठिकाणी अनेक अपघात होतात. त्यात अनेकांना आपले प्राण  गमवावे लागले तसेच अनेकांना कायमचे अपंगत्व आल्याची खंत यावेळी राज्यमंत्री सत्तार यांनी बोलून दाखवली.

ट्रॅफिक जामचा त्रास नेहमीचाच

औरंगाबाद पासून अजिंठा पर्यंत अनेक ठिकाणी काम अपूर्ण असल्याने वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. त्यामुळे हर्सूल येथे उड्डाण पुलाचे आवश्यकता आहे. तसेच काही ठिकाणी रस्ता मोठा करण्याची आवश्यक असल्याचे राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी सांगितले. सिल्लोड शहरातून जाणारा रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 सिल्लोड मध्ये अनेक समस्या

 महामार्गाचे चौपदरीकरण करताना सिल्लोड शहरात अनेक ठिकाणी पाईप लाईन तुटली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतोय. तुटलेली पाईपलाईन तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी दिल्या. तसेच रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मंगरूळ ते भवन पर्यंत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 सुशोभिकरण करा

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या बघण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो पर्यटक येतात या लेण्यांचे प्रवेशद्वार फर्दापूर येथे आहे. त्यामुळे फर्दापूर येथे तसेच सिल्लोड शहरात रस्त्याच्या सुशोभीकरण करण्याच्या सूचना राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी दिल्या.

औरंगाबाद - जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या समस्यांविषयी मी पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी साहेबांना भेटणार आहे. त्या बैठकीत सर्व अडचणी दूर होऊन कामाला गती येईल अशी अपेक्षाही आहे असे <span;>राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी सांगितले.


आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा