जागृतीमंच तर्फे श्रद्धा श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन
संभाजीनगर/ प्रतिनिधी - सध्या सर्वच वर्तमान पत्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारा च्या बातम्या वाचायला मिळतात, या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आणि अनेक भयावह प्रश्न निर्माण करणाऱ्या आहेत. समाजात सुरक्षित वातावरण कुठे शोधाव या विवंचनेत आता आपण भटकत आहोत. यानिमित्त जागृतीमंच च्या वतीने श्रद्धा श्रद्धांजली हा भक्ती भजनाचा कार्यक्रम तापडिया नगर, दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात महिलांनी सामाजिक जागृती करणाऱ्या भजनांचे गायन केले. अनेक भजन टाळ मुंदगाच्या गजरात गात अत्याचारात बळी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली वाहिली.
भजनरुपी कार्यक्रम अंजू बुगे, वर्षा मुंढे, अनु जोशी, संगीता काब्रा, निर्मला म्हस्के यांनी यशस्वी केला, श्रावण महिन्यातील सणानिमित्त प्रसाद ही वाटण्यात आला.