त्या डीवायएसपीला बेदम चोप
औरंगाबाद / प्रतिनिधी : जालना रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये बुधवारी रात्री काही ग्राहक बसलेले असताना 10:45 च्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या आर्टीका कार मधून तीन तरुण उतरले आणि सरळ रेस्टॉरंट मध्ये घुसले. लष्करी जवानासारखा हेअर कट अंगात जीन्स व पांढरा शर्ट, पायात चपला, हातात पोलिसांची फायबर काठी घेऊन एका 22 वर्षीय तरुणाने डीवायएसपी असल्याचे सांगत दादागिरी सुरू केली.
त्या तोतया डीवायएसपीने ग्राहकांसह हॉटेलच्या मालकाला धमकावणे सुरू केले व व्यवस्थापक रामेश्वर आणि दिनेश जगदाळे यांना हॉटेलच्या कागदपत्राची विचारणा केली. त्याच्या पायात चप्पल आणि तोंडाचा उग्र वास येत असल्याने रेस्टॉरंट मध्ये बसलेल्या तरुणीला शंका आली आणि त्यानंतर त्याचे बिंग फुटले. त्याच तोतया डीवायएसपीला निराला बाजारात तरुणांना खेटने मात्र महागात पडले त्याने शिवीगाळ आणि धमकावणे सुरू केल्याने तरुणांनी त्याला चांगलेच झोडपले.
हाईडआउट रेस्टॉरंटचे जटाळे यांनी जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्याकडे तक्रार केली तेव्हा त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू होता. त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.