लसीकरण करण्यावर यंत्रणांनी लक्ष केंद्रित करावे - जिल्हाधिकारी
औरंगाबाद: कोविड 19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. आरोग्य यंत्रणांनी नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करावे. त्याचबरोबर चाचण्या वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज दिल्या
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, जिल्हा पोलिस अधीक्षक निमित गोयल, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी नेमाने सर्व उपजिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणेसह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्यातील सुपर स्प्रेडर असलेले दुकानदार, रिक्षा चालक, फूल विक्रेते आदींच्या चाचण्या कराव्यात. त्यांनी पहिला लसीचा डोस घेतला असला, तरीही त्यांच्या चाचण्या करण्यात याव्यात. त्याचबरोबर दुसºया डोससाठी नागरिकांना जागृत करावे. जिल्ह्यात जवळपास 19 लाखांहून अधिक लशींचे डोस देण्यात आलेले आहेत. यापुढेही अधिकाधिक प्रमाणात लसीकरण होईल, यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक लसीकरण केंद्रे, मनुष्यबळ, साधनसामुग्री यामध्ये वाढ करावी. याकरीता खासगी दवाखाने, नर्सिंग महाविद्यालये आदींना मदतीसाठी आवाहन करावे. ग्रामीण भागातील कंटेंटमेंट झोन कमी करण्यावर भर द्यावा. दुकान निरीक्षक, अन्न व औषधी प्रशासन, परिवहन विभागांच्या अधिकाऱ्यांनीही कोविड 19 चा प्रादुर्भाव होणार नाही, याअनुषंगाने कारवाई करावी. मास्क न लावणाºयांवर दंडात्मक कारवाई करावी, आदी सूचना संबंधित अधिकाºयांना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केल्या.
आटोरिक्षा चालकांनी शिस्त पाळण्याचे आवाहन
औरंगाबाद पर्यटनाची राजधानी आहे. याठिकाणी मोठ्याप्रमाणात पर्यटक येत असतात. शहराच्या शिस्तीचे दर्शन आॅटोरिक्षा चालकांच्या पेहरावावरून होत असते. तेव्हा सर्व आॅटोरिक्षा चालकांनी परवाना सोबत बाळगावा, आवश्यक तो ड्रेस परिधान करावा. शासनाच्या सर्व निदेर्शाचे पालन करावे. सर्व आॅटो रिक्षा चालकांनी शिस्तीचे पालन करावे, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.