पाणी प्रश्न लवकर मार्गी लावला नाही तर आयुक्तांना घेराव
औरंगाबाद/ प्रतिनिधी - संतपाल नगर ,न्यू पहाडसिंगपुरा येथील नागरिकांनी सततच्या पाणीप्रश्नाला कंटाळून मनपातील अधिकाऱ्यांना निवेदन दिले. पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागला नाही तर आयुक्तांना घेराव घातला जाईल अशी संतप्त प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली.
सतपाल नगर न्यू पहाडसिगपुरा भागात गेल्या अनेक वर्षांपासून अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांनी मनपा कार्यकारी अभियंता यांना भेटून निवेदन दिले ,येत्या काही दिवसात पाणी सुरळीत न झाल्यास थेट मनपा आयुक्तना घेराव घातला जाईल असा इशारा या वेळी दिला आहे.
न्यू पहाडसिंगपुरा भागातील सतपाल नगर ,आदर्श नगर,पवन नगर आणि जगदिशनगर आदी परीसरात गेल्या अनेक वर्षांपासून अंनियमित पाणी पुरवठा केला जात आसून , आठवड्यातुन 6 व्या दिवशी सप्लाय असतो पण पाण्याची वेळ निश्चित नसते यामुळे नागरिकांना अक्षरश रात्र भर पाण्याची वाट पाहवी लागते.यात काही वेळात पाणी बंद केले जाते.
या मुळे स्थानिक नागरीकात मनपा प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट पसरली असून ,या वर जाब विचारण्यासाठी गुरुवारी दुपारी येथील महिला मंडळ व बहुसंख्य नागरिक मनपा कार्यालयात धडकले. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्या दालनात जाऊन पाणी आताच सोडण्याची मागणी केली.या वर कोल्हे यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले या नंतर आंदोलनकर्ते परतले.
आम्ही सर्व नियमित पाणी पट्टी भरून सुद्धा आम्हाला पाणी दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला. तर काही नागरिकाची तक्रार आहे की मुख्य जलवाहिनी वर काही लोकांनी अनधिकृत नळ कनेक्शन ( जोडणी)केल्याने त्यांच्या परिसरात मुबलक पाणी येत नाही .