शहरातील प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर
औरंगाबाद / प्रतिनिधी - एप्रिल 2020 रोजी पासून महानगरपालिका सदस्यांचा कार्यकाळ संपल्या ने सार्वत्रिक निवडणूक घोषणा करण्यात आली होती. त्या नुसार मनपाने वॉर्ड रचना आरक्षण सोडत काढली होती. या वर काही नागरिकांनी आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात या विरोधात धाव घेतली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
नुकताच राज्य शासनाने राज्यभर मनपा, नगरपरिषद, नगरपालिका यांच्या बहुसदस्य प्रभाग नुसार निवडणुका जाहीर केल्या. त्यानुसार निवडणूक आयोगाने मनपा प्रशासनाला प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करण्याचा सूचना केल्या. त्या पद्धतीने मनपा ने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करून आयोगाला सादर करण्या करीता मनपा उपायुक्त संतोष ठेंगळे व त्याची टीम मुंबई ला रवाना झाली असून,सूत्रांच्या माहिती नुसार बुधवार दि. 8 डिसेंबर रोजी आयोगा समोर तो आराखडा सादर करणार आहे.