दुचाकीची पथ दिव्याच्या खांब्याला धडक
दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. ठाणे जिल्ह्यातील अशाच एका अपघाताचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या मराठा सेक्शनकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर संदीप चव्हाण हे लोखंडी ग्रील घेऊन रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली आणि थेट पथदिव्यांच्या खांबाला जाऊन धडकली.
ही धडक इतकी जोरदार होती, की दोन्ही मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना स्थानिकांनी तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर संदीप चव्हाण यांच्याही पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे.