शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियनचे आंदोलन यशस्वी

शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियनचे आंदोलन यशस्वी

औरंगाबाद / प्रतिनिधी -  सेव्हन हिल्स येथील फुटपाथ विक्रेता वडार व शिकलकरी  समाजातील बेघरांना घरे देण्याचे, कॅनॉट प्लेस येथील फुटपाथवरील तारकुंपण काढण्याचे तसेच रविवार बाजारात पथविक्रेत्यांसाठीचे दरफलक लावण्याचे  आदेश मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिल्याने शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियन संलग्न आयटक व नॅशनल हाॅकर्स फेडरेशन चे आंदोलन यशस्वी झाले.
          अतिक्रमण विभागाला पथविक्रेत्यांच्या  विरोधात वापरणार नाही असे आश्वासन देऊनही मनपा अतिक्रमण विभागाने सेवन हिल्स येथील फ्रान्सिलीयन स्कुल ऑफ एक्सलन्स जवळील फुटपाथवरील वडार समाजाच्या पथविक्रेत्यांच्या राहुट्या तोडुन त्यांचे सामान उचलुन नेले होते. याच्या निषेधार्थ शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियन संलग्न आयटक व नॅशनल हाॅकर्स फेडरेशन तर्फे  सेवन हिल्स ते मनपा टाऊन हॉल कार्यालय पर्यंत चालत येत पदयाञा काढणार होते परंतु मनपा अतिरीक्त आयुक्‍त रवींद्र निकम यांनी चर्चेला बोलावल्याने पदयाञा स्थगित करण्यात आली होती.  मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत शहीद भगतसिंग हाॅकर्स फेडरेशन ने निवेदन सादर केले . शिष्टमंडळाशी आयुक्तांनी सकारात्मक चर्चा केली. कॅनॉट प्लेस येथील फुटपाथवरील तारकुंपण काढण्यासंदर्भात स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली, सेव्हन हिल्स येथील फुटपाथवरील वडार व शिकलकरी समाजातील पथविक्रेते फुटपाथवरच गेल्या 40 वर्षांपासुन राहतात ही बाब लक्षात घेऊन शबरी घरकुल योजनेतून त्यांना घरे देण्याचे तसेच जाफर गेट गांधीनगर परिसरातील रविवार बाजारात होत असलेली बेकायदेशीर वसुली रोखण्यासाठी वसूली ठेकेदाराचा फोटो व कीती रक्कम द्यायची इ माहीती बोर्ड लावण्याचे आदेश मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी उपस्थित अतिरीक्त आयुक्‍तांना दिले. यावेळेस अ‍ॅड अभय टाकसाळ यांनी हाॅकर्स झोन, नो हाॅकर्स झोन ठरविण्या पुर्वी दिवाळी,दूसरा ईद, होळी, राखी इ सणवाराचे फेरीवाले व सुया पोत इ विकणारे भटके फेरीवाले या सर्वांचा सर्वे झाल्याशिवाय सर्वे पुर्ण झाला असे समजता येणार नाही, त्याचबरोबर सर्वे पूर्ण झाल्यानंतर व निवडणुक होऊन आलेल्या शहर पथ विक्रेता समितीलाच हाॅकर्स झोन नो हाॅकर्स झोन ठरविण्याचा अधिकार आहे तोपर्यंत पथविक्रेता उपजिवीका संरक्षण व विनिमयन कायदा 2014 च्या कलम 3(3) प्रमाणे पथविक्रेत्यांना विस्थापित करता येणार नाही. असेही सांगीतले. त्याबाबत चर्चा सुरु ठेवण्याचे,   1498 पथविक्रेत्यांना तातडीने विक्रेता प्रमाणपत्र देण्याचे तसेच दुसर्या टप्याचा सर्वे सुरु करण्यात येणार असल्याचीही माहीती आयुक्तांनी शिष्टमंडळास दिली. 
यावेळेस खालील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते. 
 मागण्या ःःःःःःःःःःःःःःःःःःःःः
१) फ्रान्सिलीयन स्कुल ऑफ एक्सलन्स, सेव्हन हिल्स येथील फुटपाथवरील  वडार व शिकलकरी  समाजाच्या पथविक्रेत्यांना दि. २०/१२/२०२१ रोजी म.न.पा. अतिक्रमण विभागाने बेकायदेशीरपणे जप्त केलेले कपडे, पाटे-वरवंटे, अंदाजे 9 ते 10 हजार रुपये कींमतीचे 100  पाटे वरवंट्यासाठीचे दगड  व संसारोपयोगी सामान तत्काळ परत करा.
२)  फ्रान्सिलीयन स्कुल ऑफ एक्सलन्स, सेव्हन हिल्स येथील फुटपाथवरील पथ विक्रेत्यांना कडाक्याच्या थंडीत बेकायदेशीरपणे उद्ध्वस्त करणार्‍या म.न.पा. अधिकार्‍यांवर कारवाई करा.
३) वरील पथविक्रेते हे बेघर आहेत, बेघरांना घरे देण्याची जबाबदारी म.न.पा. ची आहे. प्रधानमंत्री आवास योजनेखाली २०२२ पर्यंत सर्वांना घरे देणार होतात, या पथविक्रेत्यांना घरे मिळेपर्यंत त्यांच्या राहुट्या उद्ध्वस्त करु नये. त्यांचे घरकुलांचे फाॅर्म भरुन घ्या .
४) पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनीमयन कायदा २०१४ च्या तरतूदींचा काटेकोर अंमलबजावणी करा, या पथविक्रेत्यांचे पुनर्वसन करा.

5) शाळेच्या दारात फुटपाथवरील बियर बार हटवा  गरीब वडार समाजाच्या पथविक्रेत्यांवर बेकायदेशीर कारवाई करू नका
6) कॅनॉट प्लेस येथील फुटपाथवरील तारकुंपण काढण्यात यावे
7) रविवार बाजारात पथविक्रेत्यांकडुन  होत बेकायदेशीर वसुली रोखण्यासाठी व सदर रक्कम मनपा तिजोरीत आणण्यासाठी अधिकृत वसुली ठेकेदाराचा फोटो व कीती रक्कम पावती घेऊन द्यायची याचा माहीती बोर्ड बाजारात लावा
8)  सर्वे पुन्हा सुरु करा इ मागण्या करण्यात आल्या होत्या .
या शिष्टमंडळात भगतसिंग हाॅकर्स युनियन चे अध्यक्ष ऍड. अभय टाकसाळ,  लक्ष्मीबाई मासोळे, गंगूबाई मासोळे, शहबाज अहमद, टी एस चव्हाण हे यांचा समावेश होता अशी माहीती संघटनेचे सेक्रेटरी कीरणराज पंडीत, विकास गायकवाड, भालचंद्र चौधरी,  आतीक बागवान, एजाज बागवान, विजय रोजेकर, इसाक शेख, इमरान बागवान, माधवराव गायकवाड इ नी कळवले आहे.  उर्वरित प्रश्नांवर सनदशीर मार्गाने पाठपुरावा सुरुच ठेवूत अशीही माहीती संघटनेने दिली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा