महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय पहिली ते बारावी पर्यंत ऑफलाइन शाळेला परवानगी
मुंबई /प्रतिनिधी - 1 डिसेंबर पासून पहिली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू करणार असल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू कराव्यात की नाहीत, याबाबत अनेकांची दुमत होते. पण अखेर ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं पहिली ते दहावीपर्यंत शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवलाय. पण शाळा सुरू करत असतानाही विद्यार्थ्यांना कोविड 19 च्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. विशेषतः त्याची जबाबदारी ही शिक्षकांवर अधिक असणार आहे.
राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्या जसजशी कमी होऊ लागली त्याप्रमाणं शाळा सुरू करण्यात आल्यात. राज्याच्या शिक्षण विभागानं आता पहिलीपासून दहावीपर्यंत सर्व वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिलीय. प्राथमिक शाळा ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागानं मांडला होता, त्याला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीय. शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या आरोग्य विभागानं परवानगी दिली होती. याशिवाय चाईल्ड टास्क फोर्सनं देखील शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलीय.