भाजपा ओबीसी जागर अभियान सुरू

भाजपा ओबीसी जागर अभियान सुरू

औरंगाबाद/प्रतिनिधी-   परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातून  मौ.डिघोळ येथून भाजपा ओबीसी जागर अभियानची आज सुरूवात करण्यात आली.
  राज्यातील तिघाडी सरकारने ओबीसी सामाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले व  ओबीसी समाजाच्या विविध विषयांना वाचा फोडण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. योगेश (अण्णा) टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ओबीसी जागर अभियानास सुरवात केली आहे.      
  ओबीसी समाजाला पूर्वीप्रमाणेच राजकीय आरक्षण  मिळाले पाहिजे ही चळवळ घेऊन राज्यभर जागर करणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी अभियानाचे स्वागत व विधीवत पुजन माजी आमदार मोहन फड यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा ग्रामीण अध्यक्ष भागवत बाजगीर, भाजपा ओबीसी मराठवाडा विभागीय  अध्यक्ष प्रदिप तांदळे,भाजपा महिला मोर्चा परभणी ग्रामीण अध्यक्ष विमलताई  पवार, तुकाराम पाटील,नितीन रसगर, सुभाष सावंत भाजपा जि.सरचिटणीस, निवृत्ती महाराज, अनंत गोलाईत ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य, महादेव गिरे पा.,मंगेश मुळी,शरद मुळी,परमेश्वर कारभारी गव्हाडे,अशोक दशरथ रासवे,गणेश हांडे,नितेश लष्कर,गिरे पाटील किसान मोर्चा, शिवाजी मोहळ,सर्व भाजपा सन्मानिय पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा