नुकसानग्रस्तांना मदत देण्यास सरकार कटिबद्ध - कृषिमंत्री अब्दुल सत्तार

कन्नड- सिल्लोड  /प्रतिनिधी -  जिल्ह्यातील कन्नड व सिल्लोड तालुक्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाची कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जावून पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

      मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नुकसानीच्या मदतीबाबत लवकरच घोषणा करतील असे स्पष्ट करीत  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले.

    अधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्या पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कन्नड तालुक्यातील पाणपोई फाटा, औराळा, जेहुर, निपाणी तसेच सिल्लोड तालुक्यातील सोनअप्पावाडी, बोरगाव वाडी, भराडी, डोईफोडा शिवारातील अवकाळी पाऊस व  गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.

यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कन्नड तालुक्यातील जेहुर गावात गावकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा,  सध्या राज्यात सातत्याने वातावरणातील बदलामुळे एक वेगळं निसर्गचक्र आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यात आतापर्यंत तीन वेळा अशी आपत्ती आली असून गेल्या दोन्ही आपत्तींच्या संदर्भात पंचनामे पूर्ण करून सरकारने आतापर्यंत सर्वाधिक 12 हजार कोटींची मदत नुकसानग्रस्ताना दिली. आताच्या झालेल्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे सुरू असून ते लवकरच पूर्ण होतील. नुकसानग्रस्तांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं आहे असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

     या पाहणी दौऱ्यात जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार नितीन पाटील, व्हाईस चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, तहसीलदार संजय वारकड, उपविभागीय कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे , माजी पं. स. सदस्य सत्तार बागवान, सरदारसिंग लखवाल यांच्यासह महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा