लेबर कॉलनी प्रकरणात जैसे थे न्यायालयाचे आदेश

लेबर कॉलनी प्रकरणात जैसे थे न्यायालयाचे आदेश

औरंगाबाद/प्रतिनिधी - लेबर कॉलनी प्रकरणात जमीन मालक नवाब मोहंमद युसुफोददीन खान यांनी जिल्हा प्रशासना विरूध्द दाखल केलेल्या जैसे थे परिस्थीती ठेवण्याबाबतच्या अर्जावर महापालिकाच्या विषेश न्यायालयात सुनावणी होऊन लेबर कॉलनी येथील सदनिका व परिसर जैसे थे का ठेवण्यात येऊ नये या बाबत जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी, आयुक्त महानगरपालिका, मुख्य अभियंता कार्यकारी अभियांता, अधिक्षक अभियंता सां.बा. विभाग औरंगाबाद यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

   प्रकरणात पुढील सुनावणी 7 मार्च रोजी होणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी 3 मार्च रोजी काही सदनिका ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सांगीतले होते व शुक्रवारी पाडापाडीस सुरूवात होण्याची शक्यता आहे असे वत्त् प्रकाशीत झाल्याने लेबर कॉलनी येथील जमीनीचे मुळ मालक नवाब मोहंमद युसुफोददीन खान यांचे मुख्त्यारआम रफिक अहमद मोहमंद उस्मान यांनी ॲड. सोहेल फारूकी यांच्या मार्फत न्यायालयात जैसे थे स्थिती ठेवण्या बाबत युक्तीवाद केले असता मा. न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाला तात्काळ जैसे थे बाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर प्रकरणी ॲड. सोहेल फारूकी यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड. तौफिक अहमद, ॲड. जकी शेख, ॲड. जाकेर, ॲड. मोईज यांनी मदत केली

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा