नागरिकांच्या समस्येसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मनपात
औरंगाबाद / प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने शुक्रवारी 24 जून रोजी मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडये यांना शहरातील विविध मूलभूत समस्या विषयी निवेदन देण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने सध्या पावसाळा सुरू झाला आसून शहरात मागील वर्षी अतिवृष्टी मुळे नदी नाले ओसंडून वाहून नारेगाव, हीलाल कॉलनी, जलाल कॉलनी, टाऊन हॉल नुर कॉलनी, पोस्ट ऑफिस नूर कॉलनी, जुना बाजार बारूद नगर नाला या परिसरातील गोर गरीब नागरिकांच्या घरात पाणी शिरून जीवन आवश्यक वस्तूसह आर्थिक नुकसान झाले होते. या मुळे मनपा प्रशासनाने तत्काळ शहरातील नदीनाल्याची साफसफाई करून मागील वर्षासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी. असे निवेदन राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केले आहे.
या शिवाय रेल्वे स्टेशन परिसरातील सिलमील सादतनगर भागात मनपाच्या शाळेत मोठया संख्येने विद्यार्थी आसून यांना शाळेत बसण्यासाठी जागा नाही. वर्ग खोल्या सुध्दा नाहीत. यामुळे या भागातील गोर गरीब नागरिकांच्या मुलांना शिक्षणापासून मुकावे लागत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने तात्काळ याठिकाणी जागा शोधून वर्ग सुरू करण्यात यावे अन्यथा येत्या काही दिवसात येथील सर्व विद्यार्थ्यांना घेउन आम्ही मनपा मुख्यालयात सदर वर्ग भरून येथेच शाळा भरविण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला यांनी प्रशासना ला दिला आहे.
या सह इतरही समस्या प्रशासनाने तत्काळ सोडवाव्या असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी शेख कय्युम अहेमद,मुखातर खान, अश्फाक कुरेशी ,मयूर सोनवणे ,मुदतसर अन्सारी आदी सह मोठया संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी याची उपस्थिती होती.