अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची मागणी

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची मागणी

औरंगाबाद /प्रतिनिधी - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री  भागवत कराड  यांचे बजाज नगर औरंगाबाद येथे राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी च्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी भारत सरकारला शिफारस करून पाठपुरावा करण्यासंदर्भात नामदार भागवत कराड यांना निवेदन देण्यात आले.
     याप्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  अर्जुनराव गालफाडे प्रदेश महासचिव,  मारुती गायकवाड, माजी सैनिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अरविंद गायकवाड, औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष विलास सौदागर, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ गालफाडे, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पाटोळे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी  भागवत कराड यांनी मी स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत औरंगाबाद महानगरपालिकेचे नगरसेवक राजू शिंदे, भाजपचे ग्रामीण उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया, दगडोजिराव देशमुख महाविद्यालयाचे उपप्राचार्य  डॉक्टर संजय सांभाळकर, पांडुरंग बारस्कर, मच्छिंद्र पुलावळे, अनिल आवळे इत्यादी हजर होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा