शेवटची भेट ठरली तिच्या जीवनाचा अंत

शेवटची भेट ठरली तिच्या जीवनाचा अंत

चंद्रपूर /प्रतिनिधी-  ब्रेकअप  झाल्यामुळे शेवटची भेट म्हणून प्रेयसीला भेटण्यासाठी बोलावले आणि त्याचवेळी चारचाकी कारने मुलीला धडक दिली. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातात प्रेयसीचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, चंद्रपूर शहराबाहेरच्या एका खाजगी ले-आउटमध्ये शीतल मेहता नामक 20 वर्षीय मुलीचा संशयास्पद अपघात झाल्याची माहिती समोर आली आणि मेहता कुटुंबियांना एकच धक्का बसला.

प्रेमी युगुलात ब्रेक-अप झाल्यावर शेवटची भेट म्हणून शीतलच्या अभिषेक भटारकर नामक मित्राने शेवटचे भेटू यासाठी आग्रह धरला आणि शीतलने यासाठी तयार होत तेच निर्जनस्थळ गाठले. हे स्थळ शहराच्या बाहेर असलेल्या एका खाजगी ले-आउट मधले होते. काही तासाने अभिषेकचा तिच्या मैत्रिणीला फोन आला. यात चारचाकी वाहनाने धड़क दिल्याने ती गंभीर जखमी आहे, असा धक्कादायक निरोप मिळाला.

अभिषेकने मदतीसाठी अन्य मित्रांना बोलावून घेत जखमी शीतलला शहरातील एक खाजगी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रुग्णालय व्यवस्थापनाने नियमित प्रक्रियेनुसार मृतदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविला आणि या घटनेत पोलिसांचा प्रवेश झाला. पडोली पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि पथकाने घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला.

दरम्यान घटनेवेळी सोबत असलेला मयत मुलीचा अभिषेक सध्या पोलिसांचा ताब्यात आहे. घटनास्थळी काही आक्षेपार्ह वस्तु आढळून आल्या आहेत. याच जागी पार्टी झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. याशिवाय आजूबाजूच्या झाडांवर वाहन धडकल्याच्या खुणा व रक्ताचे डाग देखील आहेत.

असे असले तरी पोलीस सर्व बाजूनी तपास करत आहेत. हा बलात्कार, खून की अपघात याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या प्रकरणात मयत मुलीच्या नातेवाईकांनी ही हत्या असल्याचा आरोप करत या संशयास्पद घटनेचा गांभीर्याने तपास करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी योग्य तपास केल्या यातून सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. हे प्रेमी जोडपे या निर्जन जागी बसले असताना वेगाने आलेल्या बोलेरो गाडीने नेमके मुलीला धडक देत गाडी पसार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याची माहिती या प्रकरणात घटनास्थळावर पोहोचलेल्या पडोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी दिली आहे. वरिष्ठ अधिकारी अणि फॉरेंसिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. घटनेतील सर्व पुरावे हाती घेण्यात आले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा