शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण होणे ही चिंताजनक बाब - अनिल साबळे

संभाजीनगर/ प्रतिनिधी - अलीकडील काळात शिक्षणात नव-नवीन संधी उपलब्ध होत आहेत परंतू त्याच बरोबर शिक्षणाचे बाजारीकरणही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे ही चिंताजनक बाब असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष  अनिल साबळे यांनी केले.

मिलिंद कला महाविद्यालयात महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सामाजिकशास्त्रे विषयांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी  अनिल साबळे बोलत होते. विचारमंचावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा.डॉ. दिपक गायकवाड, प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे, प्रा.डॉ. पुष्पा गायकवाड, प्रा.डॉ. ए.आय. खान, डॉ. संग्राम गुंजाळ, उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकुल, अंतर्गत हमी कक्षाचे समन्वयक डॉ. फेरोज पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या भाषणात बोलताना  अनिल साबळे पुढे म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात मोठा बदल होत असून विद्यार्थ्यांच्या बौध्दीक क्षमतेतही बदल होत आहे. त्यामुळे पालकांच्या अपेक्षा खुप वाढल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात मेडिकल व इंजिनिअरिंग पेक्षाही अनेक मोठ-मोठ्या संधी असून त्या पालकांनी व विद्यार्थ्यांनी शोधल्या पाहिजेत . या उद्घाटन समारंभाचे बीजभाषण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा.डॉ. दिपक गायकवाड यांनी केले. या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ. संजय साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान होत्या.

समारोप प्रसंगी बोलताना प्रा. डॉ. संजय साळुंके म्हणाले की, मानवी समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान पुरुषांच्या बरोबरीचे असून काळाच्या ओघात महिलांची अधोगती झाली व त्यांना निम्न दर्जा मिळाला परंतू मानवी समाजाच्या विकासासाठी महिलांचे सशक्तीकरण होणे आवश्यक आहे. वैदिक काळात स्त्रियांची स्थिती पुरुषांच्या बरोबरीची होती. या काळात स्त्रिया राज्यकारभारात, निर्णय प्रक्रियेत, चर्चासत्रामध्ये सहभागी होत होत्या. परंतू मध्ययुगीन कालखंडात भारतावरील परकीय अक्रमणामुळे स्त्रियांची स्थिती हळू-हळू खालावत गेली. या काळात सत्ता मिळविण्यासाठी महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले, यातूनच पुढे महिलांचे पतन झाले. ब्रिटिश काळात महिलांची स्थिती हळू-हळू सुधारु लागली, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व अन्य समाज सुधारकांच्या प्रयत्नामुळे महिलांना शिक्षणाची संधी मिळाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डॉ. बाबासाहेव आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून पुरुषांच्या बरोबरीचे स्थान महिलांना दिले. त्यामुळे सद्यस्थितीत महिला पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करत आहेत असे सांगितले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी शासन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य करत आहे. या अर्थसहाय्याचा योग्य पध्दतीने विनियोग करावा व यशस्वी व्हावे असे सांगितले. आरंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकुल यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. बी. बी. सुरजबन्सी यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अभिमन्यू गवई यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार डॉ. रामनाथ पवार यांनी मानले. या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषयाच्या जवळपास १५० प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी शोध निबंधाचे वाचन केले. या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा