आता प्राण्यांना मिळणार पालक महानगरपालिका देणार प्राणी दत्तक

आता प्राण्यांना मिळणार पालक महानगरपालिका देणार प्राणी दत्तक

औरंगाबाद / प्रतिनिधी - मा.प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार मा.उपायुक्त  सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत असणाऱ्या सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय मधील प्राणी हे शहरातील इच्छुक प्राणी मित्रांना,व्यक्ती,संस्था ,कंपनी यांना दत्तक देणे बाबत योजना सुरू असून या योजने अंतर्गत वाघ ,पांढरे वाघ,बिबटे,कोल्हे, सांबर,निलगाय, चितळ,माकड ,कासव ,सर्पालायघर,पक्षीघर हे एका वर्षाच्या कालावधीसाठी दत्तक देण्यात येणार आहेत.
   प्राणीदत्तक योजने संदर्भात मार्गदर्शक तत्वे ठरविण्यात आली असून यामध्ये कोणाला प्राणी दत्तक घेता येऊ शकतील याबाबतची सर्व माहिती नमुद करण्यात आलेली आहे.प्राणी दत्तक योजनेत सहभागी होणाऱ्यांना प्राण्यांच्या वर्षभरासाठी लागणारा देखभाल खर्च द्यावा लागणार आहे.
प्राणी संग्रहालयातील प्राणी दत्तक घेऊन निधी उभारणे व त्याद्वारे प्राण्यांना अधिक चांगल्या सोयी सुविधा पुरविण्याचा या मागचा उद्देश आहे.प्राणीदत्तक घेणाऱ्यां साठी सविस्तर माहिती प्राणी संग्रहालय कार्यालयात उपलब्ध आहे. करिता जास्तीत जास्त प्राणी दत्तक घेणे बाबत औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा