औरंगाबादच्या दोन तरुणीची किमया 'इकोफ्रेंडली शिवार'
औरंगाबाद / प्रतिनिधी - नष्ट न होणारे प्लास्टिक आणि नागरिकांनी रस्त्यावर फेकलेल्या १६ हजार रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करून फाईन आर्टस् चे शिक्षण घेणाऱ्या औरंगाबादच्या दोन मैत्रिणींनी चक्क इको फ्रेंडली हाऊस तयार केल आहे.
नमिता कपाळे आणि कल्याणी भारंबे या दोन्ही तरुणी शासकीय फाईन आर्टस् महाविद्यालयात एम.एफ.ए.चे शिक्षण घेत आहेत.दोन्ही मैत्रिणींनी गुवाहाटी येथील अक्षर शाळेचा यूट्यूबवर व्हिडिओ पाहून त्यांना इकोफ्रेंडली हाऊसची संकल्पना सुचली. दोघींनि मिळून सन २०२१ मध्ये इको फ्रेंडली हाऊस बनविण्याचे ठरविले.त्यासाठी त्यांनी दौलताबाद जवळ जागा निश्चित केली.त्यासाठी त्यांनी शहरातील विविध भागात रस्त्यावर फेकलेली सुमारे १६ हजार पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा केल्या. सुरुवातीला त्यांनी एक भिंत बांधून प्रयोग केला.तो प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यांनी माती, नष्ट न होणाऱ्या प्लास्टिक चा कचरा आणि बांबू च्या साहाय्याने प्लास्टिकचा शिवारच तयार केला आहे.या मध्ये कुठेही सिमेंट वापरले नसल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर आता हे शिवार बनून तयार झाले आहे.या प्रकल्पाला बनविण्यासाठी ६ ते७ लाख रुपये एवढा खर्च आला.