वंश वरणात पडला ! बालकाचा दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी
वाळूज औद्योगिक परिसरातील सिडको वाळूज महानगरमधील रुखमिनी विहारमध्ये एका तीन वर्षीय मुलाचा वरणाच्या पातेल्यात पडून आज दि.१५ रोजी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वंश योगेश हरकळ वय ३ वर्ष असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
योगेश हरकळ व त्यांचे भाऊ शुभम हरकळ हे एकत्र रुखमिनी विहार सिडको महानगर येथे राहतात, त्यांचे मूळगाव डोनगाव ता गंगापूर हे आहे. योगेश हरकळ यांना दोन मुले आहेत, मोठा मुलगा मानस ७ वर्षाचा तर लहान मुलगा वंश ३ वर्षाचा आहे , योगेश यांच्या लहान भाऊ शुभम यांना १ वर्षाची मुलगी आहे. दि १४ ऑक्टोंबर रोजी शुभम यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस होता, त्यानिमित्ताने जेवणासाठी तयार केलेले वरण हे एका मोठ्या पातेल्यात पलंगाखाली लोटलेले होते, दरम्यान वंश हा चिमुकला पलंगावर चढून झाकण असलेल्या पटेल्यामध्ये खाली उतरण्यासाठी पाय ठेवला असला ठेवलेले झाकण हे पलटी झाल्याने वंश त्या पातेल्यात पडला, नेमकाच स्वयंपाक झाल्याने वरण खूप गरम होते, वंश ची आई बाजूलाच असलल्याने त्याला ताबडतोब बाहेर काढण्यात आले परंतु वंश हा ८०% भाजला गेला. शहरातील एका खाजगी दवाखान्यात वंशला दाखल करणायत आले, परंतु वंश च्या तोंडातही गरम वरण गेल्याने त्याच्या शाहिरात इजा झाल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. आज डॉक्टरांनी खूप प्रयत्न करूनही यश आले नाही. वंशचा सकाळी १० वाजेच्या दरम्यान उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.