अखेर तीनच संपवलं होत नवऱ्याला पोलिसांनी अवघ्या 24 तासात हत्येचं गूढ उलगडले

अखेर तीनच संपवलं होत नवऱ्याला पोलिसांनी अवघ्या 24 तासात हत्येचं गूढ उलगडले

संभाजीनगर /प्रतिनिधी -  शनिवारी गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून गणेश दराखे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्तेचे गूढ अवघ्या 24 तासात पोलिसांनी उलगडले असून त्यांना मारण्यात त्यांच्या पत्नीचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरात असलेल्या स्केटिंग ग्राउंडवर काल सकाळी गणेश दराखे या व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोसकुन खून करण्यात आल्याची घटना घडली होती. सिडको पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात या खुनाचा उलगडा केला असून चार आरोपींसह आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. रूपाली गणेश दराखे असे सुपारी देण्याऱ्या पत्नीचे नाव असून सुपडू गायकवाड असे या प्रियकराचे नाव आहे.

अनैतिक संबंधातून पतीची हत्या
रूपालीने आपला प्रियकर सुपडूला दोन लाख रुपयात नवऱ्याचा काटा काढण्याची सुपारी देत हे कृत्य केले आहे तर यात अमोल चिंतामण चौधरी, अजय दिलीप हिवाळे आणि अनिकेत चौथे असे सुपारी घेणाऱ्या तिघांचे नाव आहे. या पाचही आरोपींना गुन्हे शाखेने आणि सिडको पोलिसांनी अटक करत त्यांच्याविरोधात सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, याबाबत अधिक माहिती आज पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी दिली आहे.
 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा