Flipkart वर जबरदस्त ऑफर; iPhone 13 वर मोठा डिस्काउंट

Flipkart वर जबरदस्त ऑफर; iPhone 13 वर मोठा डिस्काउंट

नवी दिल्ली : काय तुम्ही नवीन iPhone खरेदीचा विचार करता आहात? पण बजेट कमी आहे? आता टेंशन घ्यायचे कारण नाही. ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर एक जबरदस्त ऑफर दिली जात आहे. त्यामुळे iPhone 13 अगदी कमी किंमतीत खरेदी करणे शक्य आहे.

या फोनवर केवळ फ्लॅट डिस्काउंटच नाही तर एक्सचेंज ऑफरदेखील दिले जाणार आहे. याबरोबरच iPhone 13 वर ईएमआय ऑफर्स पण दिले जाणार आहे. या सर्व ऑफर्समुळे फोन फारच कमी किंमतीत मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय काय ऑफर्स दिल्या जात आहेत.

 APPLE iPhone 13 ची किंमत आणि ऑफर्स – याच्या १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत ७९,९९९ रुपये आहे. यावर ७ टक्के डिस्काउंटसह केवळ ७३,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यावर ५,९०१ रुपयांचे फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. बँक ऑफर्सचा विचार केला तर HDFC बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर ४ हजार रुपयांचे तत्काळ डिस्काउंट देणार आहे. तर Flipkart Axis बँक कार्डद्वारे ५ टक्के कॅशबॅक मिळेल.

हा फोन तुम्ही No cost EMI वर देखील खरेदी करू शकतात. यासाठी तुम्हाला दर महिन्याला १२,३३४ रुपये द्यावे लागतील. तर स्टँडर्ड EMI द्वारे २,५६६ रुपये ईएमआय द्यावा लागेल.

 यात तुम्हाला १९ हजारपर्यंत ऑफर मिळू शकतात. संपुर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळल्यावर हा फोन ५४,९९९ रुपयांमध्ये मिळू शकतो. याशिवाय काही ठराविक मॉडेल्सवर २ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो.

फिचर्स – या फोनच्या स्पेक्सचा विचार केला तर यात ६.१ इंची सुपर रेटीना एक्सडीआर डिस्प्ले असेल. यात A15Bionic चिपसेट आहे. याबरोबरच 128GB, 256GB व 512GB स्टोरेज दिलेले आहे. फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा असून याचा पहिला सेंसर १२ मेगापिक्सल्सचा असून दुसरादेखिल १२ मेगापिक्सल्सचा आहे. शिवाय १२ मेगापिक्सल्सचा फ्रंट सेंसर दिला आहे.

 

 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा