मनपाच्या पोषण आहारात  आळ्या

औरंगाबाद/ प्रतिनिधी - शाळा सुरू होताच पहिल्या आठवड्यात  शालेय पोषण आहारात अळ्या,केस खडे  निघाल्या अशा अनेक तक्रारी आल्यामुळे स्वयंसहायता बचत गटाला दिलेले कंत्राट रद्द करून इस्कॉन कंपनीला देण्यात यावे या मागणी करता डॉक्टर पद्मसिंह पाटील प्रा. विद्यालय व अमनविश्व हायस्कूल औरंगाबाद यांच्यातर्फे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

शालेय पोषण आहार हा गरीब विद्यार्थ्यांचे पोषण व वाढ चांगली व्हावी यासाठी सरकारकडून देण्यात येतो. परंतु स्वयंसहायता बचत गटाला हे कंत्राट दिल्यापासून पोषण आहाराबाबत पालकांकडून वारंवार तक्रारी येत आहेत असे डॉक्टर पद्मसिंह पाटील प्रा. विद्यालय व अमनविश्व हायस्कूल औरंगाबाद शाळेच्या मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.  मागील तीन वर्षापासून प्रशालेतील शालेय पोषण आहार देण्याची जबाबदारी महानगर पाहिलेने स्वयंसहाय्यता बचत गटाला दिली आहे. मात्र गटाकडून अत्यंत बेचव निकृष्ठ दर्जाचा पोषण आहार पुरवला जातो.  यासंदर्भात  बचत गटाला वारंवार सुचना देऊनही आहारात कोणतीरी सुधारणा झाली नाही. याउलट  आहारात अळ्या, केस, खडे सतत मिळत आहेत.या प्रकरणाची दखल घेऊन स्वयंसहायता बचत गटाचा करार करार रद्द करून "इस्कॉन या कंपनीला देण्यात यावे अशी विनंती निवेदनाद्वारे दोन्ही शाळेतील मुख्याध्यापकांनी मनपा आयुक्तांना केली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा