दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी
औरंगाबाद /प्रतिनिधी- झोन नंबर 5 आणि 6 येथील वॉर्ड अधिकाऱ्यांनी सिडको-हडको येथील सफाई कर्मचाऱ्यांचे हजरी पट वेळेवर न भरल्यामुळे कामगारांच्या पगारास विलंब होत असल्याचा आरोप कामगार शक्ती संघटनेने केला असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणी करिता मनपा अतिरीक्त आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
सिडको हडको हस्तांतरण झाल्यानंतर येथील सर्व सफाई कर्मचारी मनपाकडे आले ,सदर सफाई कामगार 11 ते 13 बचत गटाच्या मार्फत कंत्राटी पद्धतीने अनेक वर्षांपासून काम करतात, पण बचत गट व मनपा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे सतत 6 - 6 महिने उशिरा वेतन होत आहे.
बचत गटाच्या वतीने उशिरा हजरी दिल्याने व वॉर्ड अधिकारी यांनी वेळेत मनपा घनकचरा विभागाकडे हजेरी नोंद न दिल्यामुळे सफाई कामगारांना वेळेत पगार होत नाही असा आरोप कामगार शक्ती संघटनेचे गौतम खरात यांनी केला असून,जाणीवपूर्वक सफाई कामगारांना त्रास देणाऱ्या दोषीं अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी या मागणी करिता संघटनेच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी सिकडो- हडको सफाई कामगार चे प्रमुख भास्कर आढवे,शाम शिरसाठ,सुनील ठेपे,मधुकर म्हस्के दीपक इंगळे,अशोक बनसोडेआदीसह मोठ्या संख्येने महिला सफाई कर्मचारी व कामगार या वेळी उपस्थित होते.