काय आहे सीम्यूलेटर ड्रायव्हिंग टेस्ट मशीन पहा व्हिडिओ
हिंगोली /प्रतिनिधी -हिंगोली जिल्ह्यातील शिकाऊ वाहण चालकांना आता शिकाऊ टेस्टसाठी वाहण रस्त्यावर चालविण्याची आवश्यकता नसुन डिजीटल युगात नविन तंत्रज्ञान आले असुन हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आलेल्या सर्व शिकाऊ वाहण चालकांना आत्ता सीम्युलेटर ड्रायव्हिंग टेस्ट मशिनवर टेस्ट देने अनिवार्य केले आहे.
ही टेस्ट पास झाल्यावर वाहनचालकास अनुज्ञप्ती दिली जाणार असुन
दिनांक 24 जून रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी सीम्यूलेटर ड्रायव्हिंग टेस्ट मशीन चे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंत जोशी, आरटीओ जगदिश माने ,आरटीओ नलीनी काळपांडे, आरटीओ शैलेश कोपुल्ला ,आरटीओ पवन बानबाकोडे ,आरटीओ स्वप्नील ससाने, आरटीओ गोपाळ हराळे, आरटीओ विक्रांत बोयने हे उपस्थित होते.