सिटी चौक ते नौबत दरवाजाच्या पंचकूआ परिसरातीलअतिक्रण हटवले

सिटी चौक ते नौबत दरवाजाच्या पंचकूआ परिसरातीलअतिक्रण हटवले

औरंगाबाद /प्रतिनिधी - सिटी चौक ते नौबत दरवाजाच्या पंचकूआ परिसरातील मंजूर डी पी  रस्त्यावर असलेले बांधीत मालमत्ता व इतर  अतिक्रमण आज मनपा अतिक्रमण हटाव पथकांनी पोलीस बंदोबस्तात कारवाई करत निष्कासित केले.

सिटी चौक ते किलेआर्क नौबत दरवाजा  पर्यंत हा 100 फुटा चा रस्ता विकास आराखड्यात मंजूर करण्यात आला होता.  हा रोड बनविण्यासाठी  नुकताच निधी मंजूर झाला,परंतु या रस्त्यावर अनेक घरे मालमत्ता आहेत तर काही प्रमाणत अतिक्रमण झालेले होते.
मनपा आयुक्त आदेशानुसार बुधवारी 5 जानेवारी रोजी मनपा उपायुक्त रवींद्र निकम याचा मार्गदर्शनाखाली मनपा अतिक्रमण हटाव पथक या रस्त्यावर धडकले आणि सदरील जवळपास 16 मालमत्ता व इतर अतिक्रमणे काढण्याची कारवाई केली. या वेळी काही नगरिकांनी स्वतःहून आप- आपले घर रिकामे करून कारवाई ला सहकार्य केले. सदर कारवाई मनपा आतरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या समक्ष मनपा अतिक्रमण हटाव पथकातील पदनिर्देशीत अधिकारी वसंत भोई,सविता सोनवणे,इमारत निरीक्षक आर एच रचातवार,पी बी गवळी ,मजहर अली, सय्यद जमशेद,सागर श्रेष्ठ, वाहन चालक सय्यद अफजल सह सिटी चौक पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सह पोलीस दलाचे  मोठया संख्येने कर्मचारी  व मनपा पोलीस व अतिक्रमण हटाव पथकांतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा