स्मशान भूमीसाठी राखीव जमिनीवरील अतिक्रमण हटवले

स्मशान भूमीसाठी  राखीव जमिनीवरील अतिक्रमण हटवले

औरंगाबाद /प्रतिनिधी - औरंगाबाद महानगरपालिका अतिक्रमण विभागातर्फे आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी मौजे मुस्तफाबाद येथील सर्व्हे न 42 बी येथील सुमारे 2 एक्कर मधील देवनगरी रेल्वे पटरीला असलेली अनाधिकृत प्लॉटींग निष्कासित करण्यात आली आहे.
   सदर प्लॉटिंगधारकांनी स्मशानभूमीसाठी राखीव असलेल्या जमिनीवर बेकायदा अनधिकृतपणे प्लॉटींग करून प्लॉट विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता असे समजले. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकामार्फत मार्फत हि  पूर्ण प्लॉटींग मोकळी करण्यात आली. 


 सदर कारवाई मा.प्रशासक तथा आयुक्त  आस्तिककुमार  पांडेय यांच्या निर्देशानुसार  मा.अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी सविता सोनवणे ,आर एस राचतवार ,इमारत निरीक्षक सागर श्रेष्ठ ,सहायक विजय जाधव ,अतिक्रमण पथकाचे पोलीस कर्मचारी व अतिक्रमन हटाव पथक यांनी पार पाडली.अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा