इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी चे वर्ग 31जानेवारीपर्यंत बंद
औरंगाबाद/ प्रतिनिधी - राज्यातील कोव्हीड-19 बाधीत रुग्णांची संख्या आणि ओमीक्रॉन या नवीन व्हेरीयंट ला पूर्णपणे नियंत्रीत करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचा होणारा जमाव कमी करणे आवश्यक आहे. त्यामूळे कोव्हिड-19 प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिकवर्ष वाया जाऊ नये व त्याचा मानसिक परिणाम विद्यार्थी व पालकांवर होऊ नये या धारणेतून शाळा सुरू करण्यात आलेले इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी चे वर्ग दि. 6 जानेवारी ते दि. 31 जानेवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे.
कोरोना ओमीक्रोन व्हायरस चा वाढता प्रभाव बघता ,महानगरपालिका पालिका प्रशासनाने शहरातील खाजगी व मनपा चा इयत्ता 1 ली ते 8 वी प्रेयत शाळा 6 जानेवारी ते 31 जानेवारी प्रेयत वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे असल्याची माहिती मनपा शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी दिली.