वॉटर ग्रीड व जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबविणार - राज्यमंत्री अब्दुल सत्तार
सिल्लोड /प्रतिनिधी - पिण्याच्या पाण्यासाठी राज्य सरकारने आता नवीन जल आराखडा तयार केला असून प्रतिव्यक्ती 70 लिटर याप्रमाणे आता नागरिकांना पाणी देता येणार असल्याची माहिती देत सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातील प्रत्येक गावात घर तेथे नळ सुविधा देण्यासाठी वॉटरग्रीड व जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गोळेगाव खुर्द येथील जलकुंभाच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
गोळेगाव खुर्द ता. सिल्लोड येथील जलकुंभ बांधकाम व पाईपलाईन कामाचे भूमिपूजन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सोमवार ( दि.14 ) रोजी संपन्न झाले. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. गोळेगाव खुर्द ला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून 10 लाख तर 14 व्या वित्त आयोगातून 7 लाख पन्नास हजार असे एकूण 17 लाख 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे ( सिल्लोड ), प्रभाकर काळे ( सोयगाव ) , नवनाथ पा. दौड ( भोकरदन ), कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, सोयगाव नगर पंचायतीतील शिवसेना गटनेते अक्षय काळे, नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ,प्रशांत क्षीरसागर, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती पा.वराडे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, नायब तहसीलदार प्रभू गवळी, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता रमेश शिंदे, अभियंता गजानन जंजाळ, विस्तार अधिकारी पी.बी. दौड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, मतदारसंघात सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणाचे काम सुरू आहे . यासाठी वॉटर बँक संकल्पना राबविण्यात येणार आहे. सिंचन प्रकल्प उभारल्यानंतर मतदारसंघात सिंचन क्षेत्र वाढेल त्यानंतर पाण्याची उपलब्धता होणार असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाला ही आळा बसेल. पहिल्या टप्यात मिळालेल्या निधीतून जलकुंभ व इतर कामाला लगेच सुरूवात होणार असून दुसऱ्या टप्यातही आणखी निधी मिळेल. गोळेगाव खुर्दला मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यान्वित यंत्रणांनी जलकुंभ व पाईपलाईनचे काम गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कार्यक्रमास गोळेगाव खुर्द येथील भास्कर बनकर, सुधाकर बनकर, प्रभात इंगळे, पंडीत इंगळे , त्रिंबक गिरी, तेजराव इंगळे, निमाजी गव्हाणे, विष्णू गव्हाणे, माजी सरपंच राजुमिया देशमुख , नारायण गव्हाणे, तेजराव झोंड , दिलिप दांडगे , जाहेर देशमुख, शेख जाकीर , नासेर देशमुख, ईसमाइल देशमुख, अलिम देशमुख ,अरुण झोंड यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य सय्यद नासेर हुसेन, मुक्ताराम गव्हाणे, पानवडोद खुर्द चे सरपंच गजानन पन्हाळे, पानवडोद बुद्रुक चे उपसरपंच प्रमोद दौड, मांडणा चे उपसरपंच समाधान लोखंडे, कृष्णा काळे, राजू सोनवणे, महेंद्र बावस्कर, पिंपळदरीचे उपसरपंच किशोर कळवत्रे, सलमान बागवान, मुरलीधर बनकर, देविदास इंगळे, दादाराव बनकर, प्रभात इंगळे, दत्तू सोनवणे आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.