अमली पदार्थ तस्करीत महिलाही सहभगी
मुंबई / प्रतिनिधी - एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी अंमली पदार्थ प्रकरणी मुंबईत पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.यामध्ये 2 महिलांचा समावेश यापैकी तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी गांजाची खेप अंधेरी परिसरात ठेवायचे, तिथून मुंबईतील विविध भागात नेऊन विकायचे. यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे एक मूकबधिर व्यक्ती हे गोदाम चालवत होती. तर महिला गांजाच्या पुड्या बनवून बाजारात पाठवत असत. पोलिसांनी या प्रकरणी एकूण पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर तिघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. गोदामात 23 किलो गांजा सापडला आहे. या गांजाची बाजारातील किंमत तब्बल 2 लाख 30 हजार रुपये इतकी असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी गांजाची खेप अंधेरी परिसरात ठेवायचे आणि तिथून मुंबईतील विविध भागात विकायचे. यामध्ये दोघी महिलांचा समावेश आहे. एक मूकबधिर व्यक्ती हे गोदाम चालवत होती. तर महिला गांजाच्या पुड्या तयार करुन बाजारात पाठवत असत. पोलिसांनी त्यांच्याकडून 23 किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत 2 लाख 30 हजार इतकी आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली असून, दोन्ही महिलांना समन्स बजावण्यात आले आहे. अशरफ सय्यद (30 वर्ष), महेश शांतीलाल बिंद (33 वर्ष) (मूकबधिर) आणि मोबीन मेहबूब सय्यद (25 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी ही कारवाई केली.
कसा अडकला जाळ्यात?
मुंबईतील गोकुळ धाम परिसरात एक व्यक्ती गांजा विकत असल्याची माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सुरज राऊत यांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक केली.
आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 ग्रॅम गांजा आढळला. यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली तेव्हा त्याने गांजा तस्कर आणि त्यांच्या ठिकाण्यांची माहिती दिली.