पाच माजली ईमारत कोसळली बचावकार्य सुरु

पाच माजली ईमारत कोसळली बचावकार्य सुरु

मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमध्ये एक पाच मजली इमारत  कोसळल्याची घटना नुकताच  वांद्रे (पूर्व) येथील बेहराम नगर परिसरात घडली आहे. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून या घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी पाच फायर इंजिन, एक रेस्क्यू व्हॅन आणि 6 रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. ही घटना मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील बेहराम नगर परिसरात घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील बेहराम नगर परिसरात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 6 जणांना  बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून चौघा जणांना व्ही. एन. देसाई तर, दोघा जणांना बांद्रा येथील भाभा रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत असून, ढिगाऱ्याखाली आणखी कुणी अडकले आहे का ? याचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा