मंगळसुत्र चोराच्या गुन्हेशाखेने मुसक्या आवळल्या

मंगळसुत्र चोराच्या गुन्हेशाखेने मुसक्या आवळल्या

मंगळसुत्र चोरीसह तीन गुन्हे उघडकीस
औरंगाबाद/प्रतिनिधी -  शहरात मंगळसूत्र चोरांनी धुमाकूळ घातला आहे विष्णुनगर परिसरात महिलेचे मंगळसूत्र चोरणारा चोरटा शहर हद्दीत येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने सापळा रचून त्या चोराच्या मुसक्या आवळल्या त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता मंगळसूत्र चोरी सह तीन गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.

अधिक माहिती अशी की, जवाहरनगर हद्दीत विष्णुनगर भागात एका महिलेचे गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावुन नेणारा वंश उर्फ शंकर वडमारे हा  रिक्षा क्रंमाक MH-20-DJ-3592 याने सिडको वाळूज महानगर 1 येथील भाजीमंडी परीसरात येणार असल्याची माहीती सपोनि शिंदे यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच  28 फेबु रोजी 4.30 वाजेच्या सुमारास सापळा लावून वडमारे याला ताब्यात घेतले. त्याचे ताब्यातील रिक्षा क्रमांक MH-20-DJ-3592  त्याचा मालक नामे मुरलीधर मारुती पानकळे याच्या कडुन भाड्याने घेवुन परत न देता मालकाचा विश्वासघात केला म्हणुन पो.स्टे. जवाहरनगर येथे गुरनं 60/2022 कलम 406 भादवि गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय जवाहरनगर पोलीस ठाणे येथे गुरनं 55/2022 कलम 392 भादवि गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता मंगळसुत्र चोरी आणि दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.  एम. सिडको गुरनं 67/2022 कलम 379 भादवि प्रमाणे दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे होता त्याचा तपास केला असता रोशनगेट परिसरातून दुकाकी जप्त केली. वंश उर्फ शंकर जीवन वडमारे वय 29 वर्ष रा. ग.नं. 5, कैलासनगर, औरंगाबाद याच्याकडून गुन्ह्यातील मंगळसुत्र बाबत विचारणा केली असता 14 ग्राम सोने अंदाजे किमंत 70000/- रुपये जप्त करुन  पो.स्टे. जवाहरनगर गुरनं 55/2022 कलम 392 भादवि 2) पो.स्टे. जवाहरनगर गुरनं 60/2022 कलम 406 भादवि व 3) पो.स्टे. एम. सिडको गुरनं 67/2022 कलम 379 भादविचे या गुन्ह्यातील एकुण 1,65,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहे. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त  अपर्णा गिते, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल दुमे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज शिंदे, सफो सतिष जाधव, पोह संतोष सोनवणे, पोह चंद्रकांत गवळी, पोना भगवान शिलोटे, पोअं विशाल पाटील, विलास मुठे, रविंद्र खरात, मपोशि प्राजक्ता वाघमारे, पुनम पारधी, पोना ज्ञानेश्वर पवार, शिनगारे,नितीन देशमुख या शहर गुन्हेशाखेच्या पथकाने केली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा