ट्रांसफार्मर ची बिले काढण्यासाठी मागितली 50 हजार रुपयांची लाच

ट्रांसफार्मर ची बिले काढण्यासाठी   मागितली 50 हजार रुपयांची लाच

जालना /प्रतिनिधी  - जालना जिल्ह्यातील अंबड युनिट महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चे कार्यकारी अभियंता  प्रकाश तौर यांनी  गुत्तेदारास दि. 15 जानेवारी रोजी अंबड उपविभागाअंतर्गत बसून दिलेल्या ट्रान्सफॉर्मरची चार महिन्याची बिले काढून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 
       महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपविभाग अंबड जि. जालना चे  अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश रामकृष्णराव तौर (वय ५३, रा. प्लॉट नं 3, वासुदेव संकुल, संयोगनगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर)  यांनी अंबड उपविभागाअंतर्गत बसून दिलेल्या ट्रान्सफॉर्मरची चार महिन्याची बिले काढून देण्यासाठी गुत्तेदारास 50 हजार रुपयांची लाच मागितली. परंतु तक्रारदारास हे मान्य नसल्याने त्यांनी यासंबंधीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. माहिती कळताच ला. प्र. वि. चे पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे,  मार्गदर्शक पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उप अधीक्षक बाळु एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाने पोलीस अंमलदार जावेद शेख, शिवलिंग खुळे, गणेश बुजाडे, भालचंद्र बिनोरकर यांनी सापळा रचून कार्यकारी अभियंता यांना तडजोडी अंती 40 हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यांच्यावर पोलीस ठाणे अंबड जि. जालना येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा