श्रद्धा चाेपडे ठरली  बजाजनगरची पहिली आंतरराष्ट्रीय खेळाडू

श्रद्धा चाेपडे ठरली  बजाजनगरची पहिली आंतरराष्ट्रीय खेळाडू

औरंगाबाद/प्रतिनिधी - भारतीय ज्युदो महासंघातर्फे चंदिगड येथे आयोजित राष्ट्रीय कॅडेट ज्युदो स्पर्धेत श्रद्धा कडुबाळ चोपडेने सुवर्णपदक पटकावले.
    बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या  श्रीमती परमेश्वरी देवानी ज्युदो प्रशिक्षण केंद्रातील या खेळाडूने ४४ किलो वजन गटात हे पदक जिंकले.  या कामगिरीमुळे तिची लेबनॉन येथे होणाऱ्या एशियन आंतरराष्ट्रीय ज्युदो चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघात निवड झाली.
<span;>श्रद्धा बालपणीपासून बजाजनगर येथे प्रशिक्षक भीमराज रहाणे, अशोक जंगमे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिने २०१७ साली पहिल्याच वर्षी गोंदिया येथील राज्य ज्युदो स्पर्धेत औरंगाबादचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर २०१८ मध्ये बीडला राज्य ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, त्यानंतर तिने ज्युदाेत करिअर करण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये हिमाचल प्रदेशमधील राष्ट्रीय स्पर्धेत खेळली होती. श्रद्धा सध्या पुण्यातील खेलो इंडिया सेंटरमध्ये सराव करते. तिच्या या निवडीबद्दल राज्य ज्यूदो संघटनेचे सचिव शैलेश टिळक, तांत्रिक सचिव दत्ता आफळे, क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे, जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे, गोकुळ तांदळे, लता लोंढे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामणोदकर, विश्वजीत भावे, विश्वास जोशी, डॉ. गणेश शेटकर, प्रसन्न पटवर्धन, भीमाशंकर नावंदे, लक्ष्मीकांत खिची, विजय साठे, सुनील सिरस्वाल, मनिंदर बिलवाल, बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाचे नंदमूरी श्रीनिवास, मनोहर देवानी, अनिल पवार, नामदेव दौड, अभिजीत दळवी, शैलेश कावळे, कडूबाळ चोपडे, संतोष ढमढेरे, बप्पा दळवी, हनुमान भोंडवे, श्रीकृष्ण भोळे, एपीआय मनीषा टूले, ऋतुजा सौदागर, सुप्रिया जंगमे, सायली राऊत यांनी अभिनंदन केले.


भारताची भविष्यातील स्टार खेळाडू

श्रद्धामध्ये भारताची भविष्यातील स्टार खेळाडू बनण्याची क्षमता आहे. लॉकडाऊनमध्ये देखील तिने सराव सोडला नाही. तिने आमच्या बजाजनगरचे नाव उंचावले आहे. खेळाबरोबर अभ्यासातही ती हुशार आहे. कुठलीही गोष्ट ती फार लवकर शिकते. मेहनत करण्याची तयारी, हा तिच्यातील महत्वाचा गुण आहे.
भीमराज रहाणे व अशोक जंगमेे (प्रशिक्षक)

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा