राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

औरंगाबाद /प्रतिनिधी- जय जवान सैनिक पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण संस्था आडगांव बु. मध्ये चालु असलेल्या देशी दारू कारखान्यावर छापा मारून सुमारे १९ लाख रूपयाचा दारूसाठा जप्त केला.राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई नुकताच करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाने दिनांक २७/१२/२०२१ रोजी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे आडगांव बु. ता. जि.औरंगाबाद येथील जय जवान सैनिक पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण संस्थेच्या दोन खोल्यात छापा टाकुन बनावट देशी दारू सह दारू उत्पादनास लागणारे साहित्य असा एकुण १९ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पाच इसमांना अटक केली आहे.
         

 याबाबत अधिक माहिती अशी की, आडगांव बु. ता.औरंगाबाद येथील जय जवान सैनिक पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण संस्थेचा मालक अशोक डवले हा अन्य साथीदारासह सदर प्रशिक्षण संस्थेच्या मोठ्या दोन खोल्यात बेकायदेशिरपणे देशी दारू उत्पादनाचा कारखाना चालवित आहे. अशी खबर मिळाली होती त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद शहर विभागाचे निरीक्षक शरद फटांगडे व निरीक्षक जावेद कुरेशी यांच्या पथकाने आयुक्त श्री.कांतीलाल उमाप व विभागीय उपआयुक्त प्रदिप पवार व अधीक्षक,औरंगाबाद सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी खबरीच्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी पाच ईसमासह देशी दारू टैंगो पंच १८० मिली क्षमतेच्या एकुण ७१३२ सिलबंद बनावट दारूबॉटल, दारूबॉटलवर बुच बसवण्याचे चार ईलेक्ट्रॉनिक बॉटलिंग मशिन, ११९००० बनावट बुचे, १७२५०० बाटल्यावर लावण्यात येणारी लेबल्स, सुमारे ३००० रिकाम्या बॉटल्स, १७५० खोके, ईलेक्ट्रीक मोटार, प्लास्टिक कॅन, स्पिरीट साठविण्याचे बॅरल इत्यादीसह सुमारे १९,०७,१६०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

        सदर बनावट दारू निर्मीती कारखान्यात मिळुन आलेले ईसम १) जितेंद्र सिंग श्रीतेजभान सिंग, २. रवि सिंग श्रीबीजभान सिंग , ३) जयबली सिंग श्रीबन्सराखन सिंग - सर्व रा. बरसेली जि.सिधी (मध्यप्रदेश) तसेच
४. प्रशांत अनिल खैरनार, रा.धुळे ५) चैतन्य रामकृष्ण म्हैसकर, बेगमपुरा, औरंगाबाद यांना ताब्यात घेऊन मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे अजामिनपात्र कलमान्वये अन्य दहा आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे.
सदर गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार अशोक किसन डवले व त्याचे अन्य नऊ साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.अटक आरोपींना आज रोजी मा.न्यायालयासमक्ष हजर केले असता मा.न्यायालयाने अटक आरोपींना दोन दिवसाचा पीसीआर मंजुर केलेला आहे.सदर छापा पथकात निरीक्षक शरद फटांगडे, निरीक्षक जावेद कुरेशी, दुय्यम निरीक्षक- गणेश पवार, भारत दोंड, सहा.दु.निरीक्षक-अशोक सपकाळ, जवान- अनिल जायभाये, योगेश कल्याणकर, विजय मकरंद, किसन सुंदडे, यांचा समावेश होता.सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक जावेद कुरेशी करत आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा