मारहाण प्रकरणी सर्व आरोपिंना तत्काळ अटक करुन तक्रारकर्त्यांना पोलिस संरक्षण द्या - रुग्ण हक्क संरक्षण समितीची मागणी
लातुर / प्रतिनिधी - निंलगा तालुक्यातील कोराळी गावातील तरुणांना मारहाण प्रकरणी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने आज पिडित तक्रारकर्ते डिंगबर बिराजदार व प्रविण बिराजदार यांना सोबत घेऊन तक्रारकर्ते व कायदेशीर मदत करणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते यांना आरोपी व आरोपीचे हितचितंक यांच्या पासुन जिवीताला धोका आहे म्हणून प्रकरण संपेपर्यत पोलिस संरक्षण मिळावे व आरोपिना तत्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना प्रत्यक्ष भेटुन चर्चा करुन घटनेची सत्य हकिकत सांगुन दिले.
यावेळी सर्व आरोपिना तत्काळ अटक केली जाईल असे आश्वासन पोलिस अधिक्षक साहेबांनी समिती शिष्टमंडळाला दिले. सदर निवेदन हे रुग्ण हक्क संरक्षण समिती व तक्रारकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा वतिने देण्यात आले. यावेळी तक्रारकर्ते डिंगबर बिराजदार, प्रविण बिराजदार, रुग्ण हक्क संरक्षण समिती प्रमुख ॲड.निलेश करमुडी, महिला अध्यक्षा रेणुकाताई बोरा, लातुर जिल्हाध्यक्षा कावेरी विभुते, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथअप्पा खोबरे, चंद्रशेखर कत्ते, प्रा. संगमेश्वर पानगावे आदी मान्यवर उपस्थित होते.