राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत लाखोंची देशी जप्त
औरंगाबाद/ प्रतिनिधी-
दौलताबाद येथे छोटी मंडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारला असता जहिरोद्दीन शेख राऊब शेख त्याच्या राहत्या घरात देशी दारू भगरी संत्राचे १८०मिली क्षमतेचे २७ बॉक्स (१२९६ बाटल) एकूण किंमत ७७७६० किमतीचा मुद्देमाल मिळून आला धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्वात मोठी कारवाई झाल्याची चर्चा होत आहे.
ही कार्यवाई विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए.जे कुरेशी. दुय्यम निरीक्षक जी. एस पवार. दुय्यम निरीक्षक बी. एस दौंड. सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे. जवान अनिल जायभाये, ज्ञानेश्वर सांबारे, विजय मकरंद यांच्या पथकाने केली.