शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर सरकारने घेतला हा निर्णय

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर सरकारने घेतला हा निर्णय

नैसर्गिक आपत्ती किंवा अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची पुरेशी भरपाई मिळावी, या उद्देशाने आता शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पीक विमा उतरविता येणार आहे.

पुणे - नैसर्गिक आपत्ती किंवा अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची पुरेशी भरपाई मिळावी, या उद्देशाने आता शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पीक विमा उतरविता येणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने याबाबतची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामातील पिकापासून या पीकविमा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा अध्यादेश अद्याप कृषी विभागाला मिळू शकलेला नाही. त्यामुळे या विमा योजनेच्या लाभासाठी आणखी काही काळ अध्यादेशाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सरकारने पंतप्रधान पीक विमा या नावाने ही योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा केवळ एक रुपयांत उतरविता येणार आहे. मात्र या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार, कोणकोणत्या पिकांसाठी या योजनेचा लाभ मिळू शकणार, विम्याचा हप्ता कोठे व कधीपासून भरता येणार, नैसर्गिक आपत्ती किंवा अवेळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास, त्या नुकसानीची माहिती किती दिवसात आणि कोणाकडे द्यावी लागणार, विम्याची रक्कम किती मिळणार, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना किंवा नियमावली अद्यापही कृषी विभागाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या योजनेचे निकष, पात्रता आणि त्यातून मिळणारे फायदे, याबाबतची माहिती ही अध्यादेश मिळाल्यानंतरच कळू शकणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी सांगितले.

दरम्यान, याआधीपासूनच शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक योजना (मृग बहार), पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक योजना (आंबिया बहार), गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुगृह अनुदान योजना आदी विविध विमा योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यात आता आणखी या नव्या पीक विमा योजनेची भर पडणार आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम सद्यःस्थिती

 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या --- ८ लाख २९ हजार ३२९
खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र --- १ लाख ९५ हजार ७१० हेक्टर
 १ रुपयांत विमा उतरविण्याचे उद्दिष्ट --- ६ लाख ६३ हजार ४६२
 संभाव्य विमा संरक्षित क्षेत्र --- १ लाख ५६ हजार ५६८ हेक्टर

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा