जेष्ठ पशूवैद्य प्रतिष्ठानकडून विविध पुरस्काराचे वितरण
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
जेष्ठ पशूवैद्य प्रतिष्ठान मराठवाडा संस्थेतर्फे रविवारी ( ता. ४) विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
रविवारी संत एकनाथ रंग मंदिराच्या पाठीमागील श्रीनिधी मल्टीपरपज हॉल मध्ये या कार्यक्रम घेण्यात आला. यात आदर्श पशुपालक, गोपालक, उत्कृष्ट पशूवैद्य, आदर्श प्राध्यापक ( पशूवैद्य) हे पुरस्कार प्रदान करण्यातआले. प्रमुख अतिथी डॉ. संजय शिंदे ( माजी विशेष पोलीस महानिरीक्षक ( गुन्हे) , कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय गीते (भाप्रसे), सेवा निवृत्त संचालक (महावितरण) यांची उपस्थिती होती. दरम्यान अध्यक्ष डॉ. अशोक दिवाण, सचिव डॉ. रवींद्र डावरे, डॉ. बी. आर. कांबळे यांची उपस्थिती होती. दरम्यान पंधरा जणांना पुरस्कार देण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. सुधीर जोशी, आभार प्रदर्शन डॉ. बी. आर. कांबळे यांनी केले.