फिल्मी स्टाईल मारायला गेला पण आता पोलीस ठोकणार बेड्या
सध्या आजूबाजूला अशा काही घटना घडतआहेत की आपण कधी कल्पनाही केली नाही. तरुणांवरच नाही तर शाळकरी मुलांवरही चित्रपटांचा अधिकच परिणाम दिसून येत आहे.अशाच प्रकारे एका शाळकरी मुलाने फिल्मी स्टाईल मध्ये गुन्हा केल्याची विचित्र घटना समोर आली आहे.
मुलगी घरात झाडून घेत असताना अचानक एक अल्पवयीन मुलगा घरात शिरला. असं एकदम घरात कोणी शिरल्याने मुलगी घाबरून गेली. तिने आरडाओरडा सुरू केल्यावर शिरलेल्या मुलाने चाकू काढला मुलीच्या गळ्याला लावला. आरोपी मुलाने खिशातून कुंकु काढलं आणि पीडितेच्या डोक्यात भरलं. काही वेळाने मुलीने मोठ्याने आरडाओरडा केला मात्र दोघा मुलांनी तिथून पळ काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा तीन महिन्यांपासून मुलीच्या मागे लागला होता. मुलीच्या पालकांना हा प्रकार कळताच त्यांनी तिला दुसऱ्या शाळेत दाखल करून घेतले मात्र पोलिसांत तक्रार दिली नाही. शेवटी पोरगा मुलीच्या घरापर्यंत पोहोचला त्याने घरी कोणी नसल्याचा फायदा घेतला आणि मुलीच्या कपाळामध्ये कुंकु भरून गेला.
मुलीचे वडील ड्रायव्हर असून ते जेव्हा घरी आले त्यावेळी मुलीने वडिलांना सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुलाची ओळख पटली आणि आपली सूत्र फिरवत आरोपी मुलाला ताब्यात घेतलं. मुलाला आता पोलिसांनी गुन्हा दाखल करत बालसुधारगृहात ठेवलं आहे. उत्तर प्रदेशमधील महाराजगंज जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.